वाई गटात अविनाश शंकरराव भोयर यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा. भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास सर्वस्व पणाला लावून लढणार.


माहूर : जिल्हा परिषद निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीचा उत्साह वाढला आहे. माहूर तालुक्यातील वाई जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पुरुषासाठी राखीव ठरल्यानंतर या गटातून अनेक इच्छुकांनी आपली चाचपणी सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर गंगाजीनगर (करंजी) येथील अविनाश शंकरराव भोयर यांनी वाई जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रबळ उमेदवारीचे दावेदार म्हणून सर्वस्व पणाला लावून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

भावी अनेक पण प्रभावी एकच असे म्हणत सर्वांगीण विकास” हा आपला ध्यास असल्याचे सांगत त्यांनी गटातील गावागावांमध्ये भेटीगाठी, संवाद व जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे.

अविनाश शंकरराव भोयर यांनी मतदारांच्या विकासाच्या अपेक्षा लक्षात घेत वाई गटातील अडचणींवर विशेष भर देण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले. स्थानिक जनतेशी संवाद साधताना त्यांनी “विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न, पारदर्शक कारभार आणि जनतेचा विश्वास” हेच आपले ब्रीद असल्याचे मत व्यक्त केले.

दरम्यान, अविनाश शंकरराव भोयर यांच्या नावाची चर्चा वाई जिल्हा परिषद गटात वेगाने पसरत असून ग्रामस्तरावर त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चेला चांगलाच ऊत आला आहे. अनेक ठिकाणी युवक व स्थानिक नागरिकांमध्ये “नवा चेहरा, नवी उमेद” अशी भावना व्यक्त होत असून गाव कट्ट्यांवर अविनाश शंकरराव यांच्या नावाचीच चर्चा रंगताना दिसून येत आहे.

Popular posts from this blog

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किनवट शाखेतर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे किनवट येथील उपकेंद्रात विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन निवेदन दिले.

पैलवान कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ